दररोज व्यायाम आणि नियमित आहार घेऊनही वजन कमी होत नाही ?






दररोज व्यायाम आणि नियमित आहार घेऊनही वजन कमी होत नाही , हि तक्रार होती माझ्या वर्गमैत्रीणीची. आम्ही बऱ्याच वर्षांनी भेट होतो. मुळची सुंदर असलेली प्रिया आता सुखवस्तुपणाच्या तेजामुळे छानच दिसत होती. वाढलेले वजन सोडता बाकी तब्येतीची काही तक्रार नव्हती. खाणे ,नियमित  व्यायाम चांगला एक तास असे असूनही वजनाचं काटा काही हलत नव्हता. नाडी परीक्षा केल्यावर जाणवले दूषित कफाचे प्रमाण.
त्यांमुळे सहजच तिला तिच्या पाण्याचे आणि  एकूणच द्रव पदार्थांचे रोजचे प्रमाण विचारले. आयुर्वेदाचार्य असल्यामुळे भरपूर पाणी प्या याचा अर्थ लोक कसा घेतात याचा एकंदर अनुभव होताच. प्रिया सांगू लागली रोज उठल्यावर १ग्लास स्मुदी ३०० मिली , त्यात हिरव्या  भाज्या, फळभाज्या,फळं यांच  मिश्रण,११ वाजता नारळ पाणी , दिवसभरात १ ते दिड लिटर ताक , आणि भरपूर पाणी प्यायचे म्हणून २ ते अडीच लिटर पाणी , हे ऐकल्यावर मात्र मला तिचे वजन कमी न होण्याचे उत्तर मिळाले.
जास्त पाणी प्यायल्याने वारंवार सर्दी होणे , शिका येणे, सकाळी उठल्यावर टाचा दुखणे , जुनाट सर्दी, वारंवार आम्ल्पित्ताचा त्रास होणे आणि सगळ्यात  महत्वाचे म्हणजे सर्व प्रयत्न करूनही वजन कमी न होणे हि लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
आयुर्वेदानुसार तहान लागली कि पाणी प्यावे. पाणी सुद्धा पचावे लागते. उकळून थंड केलेले पाणी पचायला सगळ्यात उत्तम असते, ताक सुद्धा जेवणानंतर आणि तेही केवळ एक वाटी घेतल्यास त्याचा शरीराला फायदा होतो. स्मूदी सारखे पदार्थ एक्सपर्ट च्या सल्ल्याने घ्यावेत. एका दिवसात दीड ते २ लिटर  पातळ पदार्थ घ्यावेत , त्यात पाणी,  आमटी,ताक, सरबते, चहा, कॉफी आदी पेयांचा समावेश करू शकता. प्रिया ला आता मी या सगळ्या  नियमांचे पालन करून एक महिन्याने भेटायला बोलावले आहे.

आयुर्वेदाचार्य - वैद्य सुरभी वैद्य
Health Solutions - Thane (W) 
BAMS, MBA - Clinical  Research
Health & Wellness Coach
9867510223
www.wellness24by7.co.in






दररोज व्यायाम आणि नियमित आहार घेऊनही वजन कमी होत नाही ? दररोज व्यायाम आणि नियमित आहार घेऊनही वजन कमी होत नाही ? Reviewed by Experience Ayurveda on 11:28 PM Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.