आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी – डॉक्टर हिची
त्वचा खराब आहे मग हिला बस्ती का ???
आर्या, वय वर्षे ७, राहणार
टेक्सास, मागच्या ख्रिसमसला थाण्यात आजीकडे आलेली. तिची मावशी माझी पेशंट आहे.
आर्याची त्वचा अतिशय खरखरीत आहे म्हणून मावशी तिला माझ्याकडे घेऊन आली.
बाह्य परीक्षनात आर्याची
त्वचा, केस , नखं चांगलीच कोरडी होती, चष्मा मोठ्या नंबरचा होता. आत काय परीस्थिती आहे ते बघायला नाडी परीक्षा
केली, तेव्हा वात दोषाचे वैगुण्य आणि पित्त दुष्टी जाणवली म्हणजेच तिची आतडी सुद्धा अतिशय कोरडी झाली
असणार.खात्री करायला आता प्रश्न विचारायला सुरवात केली. टेक्सास हा अतिशय उष्ण
प्रदेश आहे त्यामुळे निसर्गतःच रुक्षत्व जास्त, त्यात हिच्या आहारात ब्रेड, पिझ्झा
, बर्गर यासारख्या पदार्थांचा नियमित समावेश, तुपाचा समावेश नाही , तेल अतिशय कमी
प्रमाणात , तसेच पाणी कमी पिणे , महत्वाचे
म्हणजे शाळा सकाळची असल्याने रोज सकाळी मलविसर्जनाची सवय नाही, त्यामुळे मलाच्या
गाठी किवा खडे होण्याची प्रवृत्ती, त्यामुळे टोयलेटला जाण्याचा कंटाळा या सगळ्या
गोष्टी समोर आल्या. म्हणजे त्वचा खराब असण्याचं मूळ हे पोट नियमित साफ न होण्यात
होतं. पोट साफ होत नसल्याने भ्राजक पित्त बिघडले होते , त्यामुळे त्वचा खराब झाली
आणि पित्त बिघाल्यामुळे चष्मा पण लागला. आणि
हे सगळ ठीक करायला माझ्याकडे फक्त १० दिवस होते कारण त्यानंतर तिचा मुक्काम
पुण्याला होता.
या सगळ्यावर माझ्याकडे
अगदी रामबाण इलाज होता. आदरणीय दातार शास्त्रींनी सांगीतलेला एक योग आहे त्या
तेलाचे आहे ७ दिवस मात्रा बस्ती दिले (७०
मिली तेल शौचाच्या जागेतून आत सोडणे ) आणि जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ भाताच्या
पहिल्या घासाबरोबर एक औषधी तेल आभ्यन्तर घ्यायला सांगितले.
तिसर्या दिवसापासून
मलाच्या खडे होण्याचे प्रमाण कमी झाले, त्वचे मध्ये फरक पडू लागला.
सहव्या दिवशी त्वचा बरीच नितळ झाली. या
वर्षीही आर्याची स्वारी येणार आहे मला
भेटायला.
आजकाल शाळेत जाणार्या मुलांमधे बद्धकोष्ठता
प्रामुख्याने आढळून येते. याची प्रत्येकाच्या शरीरावर निरनिराळी लक्षणे दिसू शकतात
तेव्हा पालकाना पण विनती आहे त्यांनी केवळ
लक्षणे विचारात न आहे घेता हे कशामुळे होत ते बघितलं पाहिजे. आर्याच्या केस
मध्ये फक्त त्वचेचा विचार केला असता तर चिकीत्सेला यश मिळाले नसते.
आयुर्वेदाचार्य वैद्य सुरभि वैद्य
BAMS, MBA - Clinical Research
Health & Wellness Coach
Health Solutions - Thane (W)
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी – डॉक्टर हिची त्वचा खराब आहे मग हिला बस्ती का ???
Reviewed by Experience Ayurveda
on
11:29 PM
Rating:
No comments: